मराठी अभ्यास केंद्राच्या आंदोलनाला पत्रकार संघाचा पाठींबा

     मराठी अभ्यास केंद्राच्या आंदोलनाला पत्रकार संघाचा पाठींबा
   मराठी अभ्यास केंद्राच्या आंदोलनाला पाठिंबा देताना मुंबई मराठी                        पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण

मुंबई / रमेश औताडे 

त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. दीपक पवार यांच्या नेतृत्त्वात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने आझाद मैदान येथे एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले होते.

या आंदोलनाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा सक्रीय पाठिंबा दर्शविण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, संघाचे माजी विश्वस्त प्रकाश कुलकर्णी, माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, तसेच पत्रकार संघाचे सदस्य किरण नाईक, हेमंत सामंत आणि राजेश माळकर यांची उपस्थिती होती.

मराठी भाषेच्या अस्मितेच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या या संघर्षात मुंबई मराठी पत्रकार संघ नेहमीच ठामपणे मराठीच्या बाजूने उभा राहील, असा ठाम विश्वास यावेळी संदीप चव्हाण यांनी व्यक्त केला. 

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन