दिव्यांगाची परवड सरकार थांबवणार कधी !
दिव्यांगाची परवड सरकार थांबवणार कधी !
मुंबई / रमेश औताडे
दिव्यांग व्यक्ती स्वतः व त्याचे आई वडील,पत्नी, मुले यांना रुग्णालयात घेऊन जात असताना स्वतःच्या मालकीची गाडी नसल्यामुळे भाड्याची गाडी घेऊन जातो. अशावेळी दिव्यांगांना टोल टॅक्स सवलत मिळत नाही. दिव्यांगा जवळ असलेल्या युडीआयडी कार्ड चा सुद्धा उपयोग होत नाही. दिव्यांग सोबत टोल नाक्यावर वादविवाद होतात. त्यामुळे सरकारने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी डॉ सतीश लड्डा व ज्ञानदेव कदम यांनी केली आहे.
दिव्यांग व्यक्ती जवळ मालकीची गाडी असो किंवा नसो दिव्यांग व्यक्ती जवळ असलेल्या युडीआयडी कार्ड वरच दिव्यांगांना टोल टॅक्स माफीची सवलत मिळावी. सरकारने लाडकी बहीण, लाडका शेतकरी, असे सर्वच घटक लाडके केले आहेत. मग लाडका दिव्यांग पण सरकारच्या नजरेत आणून देण्यासाठी संबंधितांना निवेदन दिले आहे. निसर्गाने तर आमच्यावर अन्याय केला आहेच. मात्र सरकारने तरी करू नये. अशी मागणी ज्ञानदेव कदम यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत निवेदन दिले आहे. संबंधित सर्व विभागांना पत्रव्यवहार केला आहे. सरकारचे कायदे दिव्यांग व्यक्तीला न्याय मिळावा असे असताना टोल नाक्यावर वाद होतात. त्यासाठी आमच्या मागणीला न्याय द्यावा अशी संघटनेने मागणी केली आहे.
Comments
Post a Comment