समाजसेवीची ११४ वर्ष .....

     समाजसेवीची ११४ वर्ष .....

मुंबई / रमेश औताडे

"द सोशल सर्व्हिस लीग" ही संस्था गेल्या ११४ वर्षांपासून परेल विभागात समाजकार्य क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रात आणि कौशल्याधारित शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे.

या संस्थेतून भारतातील पहिला सहा महिन्यांचा समाजकार्य प्रशिक्षण वर्ग १९२४ साली संस्थेचे तत्कालीन सचिव कामगार नेते ना. म. जोशी यांनी सुरू केला. या प्रशिक्षण वर्गास २०२४ ला १०० वर्षे पूर्ण झाली.

या वर्षी हा प्रशिक्षण वर्ग १०१व्या वर्षांत पदार्पण करून त्या अनुषंगाने "एन. एम. जोशी डिप्लोमा इन सोशल वर्क अ‍ॅण्ड कम्युनिटी मेटल हेल्थ" हा एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स जुलै २०२५ पासून सुरू होत आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी अभ्यासक्रम समन्वयक प्रा. प्राजक्ता सावंत यांच्याशी ९८९२९७२३३८ या क्रमांकावर संपर्क साधावा.अशी माहिती संस्थेचे विश्वस्त जागतिक पर्यावरण पुरस्कार विजेते प्राध्यापक हेमंत सुधाकर सामंत यांनी पी आर न्यूज शी बोलताना दिली.


Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन