रूग्ण मित्रांच्या कार्याचा सन्मान
रूग्ण मित्रांच्या कार्याचा सन्मान
मुंबई / रमेश औताडे
जाॅय सामाजिक संस्था ही महाराष्ट्रातील गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना मदत,अंध बांधवांना मदत इ.सारखे अनेक गोष्टी समाजहितासाठी करीत असते.
संस्थेचा १० वा वर्धापन दिन जोगेश्वरी(पू) येथील अस्मिता भवन हाॅलमध्ये संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी आयोजित केला होता.समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव,समाज भूषण अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रुग्ण मित्र विनोद साडविलकर, प्रफुल्ल नवार,रेहाना शेख यांचा सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र,शाल,मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.एम.डी.वळूंजू, अविनाश दौंड,ॲड.जगदीश झायले,ॲड.रूशिला रिबेलो इ.मान्यवरांसोबत रूग्ण मित्र साथी रमेश चव्हाण,किरण गिरकर, चारुदत्त पावसकर, धनंजय पवार, अलर्ट सिटीजन फोरम संस्था प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स़स्थेच्या शीला येरागी,छाया राणे,असून्ता डिसोझा,समीर परब व कार्यकर्ते यांच्या उत्तम नियोजनातून कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.
मान्यवर, शुभचिंतक,देणगीदार, मित्र मंडळी,सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी जाॅय सामाजिक संस्था मुंबई यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment