विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी विद्यार्थी एल्गार परिषद मुंबईत

        विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी विद्यार्थी एल्गार परिषद मुंबईत 
मुंबई / रमेश औताडे 

ओबीसी व भटके-विमुक्त विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात आणि शासनाच्या दुर्लक्षित धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी सोमवार, १० जून रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट येथे विद्यार्थी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली आहे. ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी-भटके-विमुक्त विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या परिषदेमध्ये राज्यातील विविध विद्यापीठांतील हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी व भटके-विमुक्त समाजाला दिलेली अनेक आश्वासने कागदावरच राहिल्याचा आरोप या परिषदेत करण्यात येणार आहे. विशेषतः प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र वसतिगृहांची घोषणा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, तसेच महाज्योती मार्फत अधिछात्रवृत्तीचे वितरण – या सर्व घोषणांची अंमलबजावणी अपूर्ण असल्याचा मुद्दा उपस्थित होणार आहे.

या परिषदेस ओबीसी नेते मा. प्रकाश अण्णा शेंडगे अध्यक्षस्थान भूषविणार असून, प्रा. टी.पी. मुंडे, चंद्रकात बावकर, जे.डी. तांडेल, दशरथदादा पाटील, लक्ष्मण गायकवाड, प्रा. नारायण भभोसले, पल्लवी रेणके यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन