छत्रपती शाहू महाराज स्मृती दिनी " निधी वापस करो " अभियान

छत्रपती शाहू महाराज स्मृती दिनी " निधी वापस करो " अभियान
मुंबई / रमेश औताडे 

अनुसूचित जाती जमातींसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांचा निधी अयोग्य ठिकाणी वापरला जात आहे. हा निधी  मागास घटकांसाठी वापरावा, त्यांची उन्नती व्हावी अशी घटनेत तरतूद आहे. मात्र सरकारी दरबारात मनमानी कारभार सुरू आहे. या मनमानी कारभारविरोधात श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत  आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने  " निधी वापस करो " अभियान ६ मे पासून राज्यभर राबवले जाणार असून या अभियानाची सुरुवात कोल्हापूर येथून होणार आहे. अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संविधानाच्या अनुच्छेद ४५ व ४६ नुसार अनुसूचित जाती व जमातींसाठी विविध मूलभूत गरजांवर खर्च करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विशेष निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु, यावर्षी काही निधीचा वापर इतर विभागांकडे वळवण्यात आल्याने या  समाजात नाराजी निर्माण झाली आहे. अभियाना अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले जाणार असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख शामभाई बागुल यांनी दिली.


Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन