प्रायव्हेट हॉस्पीटल मध्ये मोफत उपचार कसे घेणार

  " आयुष्मान भारत " आरोग्य कार्ड साठी  "  स्माईल फाऊंडेशन " 
    
    गरीब रुग्णांचा खिसा खाली करू नका ; सरकारला दिले निवेदन

मुंबई / रमेश औताडे 


मोफत आरोग्य सेवेचा लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आयुष्मान भारत’ योजनेत मोठा तांत्रिक गोंधळ झाल्याने  नागरिकांचे कार्ड अडकून पडले असल्याने महागड्या उपचारांसाठी स्वतःचाच खर्च करावा लागत आहे. नोंदणीतील त्रुटींमुळे अनेक गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येत आहे. या पार्श्वभूमीवर स्माईल फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने सरकारला निवेदन देत गरीब रुग्णांचा खिसा खाली करू नका अशा आशयाचे निवेदन दिले आहे.

‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना ५ लाखांपर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा दिली जाते. मात्र, अनेक नागरिकांचे नाव ऑनलाइन सिस्टममध्ये तांत्रिक बाबींमुळे योग्य प्रकारे नोंदवले गेले नाही. परिणामी, मोठ्या रुग्णालयांमध्ये या कार्डशिवाय उपचार घेणे कठीण जात आहे. आरोग्य विभागाच्या यंत्रणेने गरजूंना या कार्ड चा उपचारासाठी उपयोग होण्यासाठी गांभीर्याने पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

या योजनेंतर्गत नाव नोंदवताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत

रेशनकार्डवर नाव नसणे

आधार कार्ड व मोबाईल क्रमांक न जुळणे

ऑनलाइन डेटाबेसमधील चुका

संबंधित कार्यालयात वेळेत नोंदणी न होणे

या अडचणींमुळे गरजूंना मोफत उपचार मिळत नाहीत. सरकारकडून वेळोवेळी सुधारणा करण्याच्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे आहे. एका रुग्णाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, पत्नीला शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रुग्णालयात दाखल करायचे होते. पण आयुष्मान कार्ड प्रणालीमध्ये आमचे नावच नोंद झाले नाही. त्यामुळे आम्हाला खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करावे लागले.

संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सांगितले की, "अनेक नागरिकांचे कागदपत्र अद्ययावत नसल्याने त्यांची नोंदणी रखडली आहे. लवकरच ही समस्या सोडवली जाईल. मात्र, नागरिकांचा आक्रोश पाहता प्रशासनाची ही आश्वासने पुरेशी ठरत नाहीत.
आयुष्मान भारत योजनेतील त्रुटी दूर करून अधिकाधिक गरजू लोकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, गरिबांसाठी सुरू केलेली ही योजना केवळ कागदोपत्रीच राहील. याबाबत सरकारला स्माईल फाऊंडेशन च्या वतीने निवेदन दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"