मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार 
मुंबई / रमेश औताडे

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील " आय एन एस सी आर २०२५ " हा  विशेष सन्मान पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत नवकिरण संस्थेचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र वंगे यांनी दिली.

दक्षिण अमेरिकेतील सुरिनाम येथे हा पुरस्कार सोहळा नेपाळ फिल्म टेक्निशियन असोसिएशन, मस्क नेदरलैंड, नवकिरण संस्था पोलिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. नेपाळ फिल्म टेक्निशियन असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम भूमजन तसेच एन एस एफ पी एफ बी चे विविध मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत असे संस्थेचे पदाधिकारी डॉ. आनंद टिंबे यांनी सांगितले.

नवकिरण संस्था पोलिस फाऊंडेशन, नेपाळ फिल्म टेक्निशिअन असोसिएशन व मस्क नेदरलैंड यांनी या सोहळ्यासाठी योगदान दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार संस्थेचे सचिव बाबासाहेब जोगदंड यांनी मानले. या पुरस्कार सोहळ्यातून आम्ही जगाला " बेटी बचाओ " चा संदेश देणार आहे. याकरिता नेपाळचे महामहिम उपराष्ट्रपती राम सहाय यादव यांनी आमच्या संस्थेच्या शिष्टमंडळाची भेट स्वीकारून प्रोत्साहन दिले आहे. 

नवकिरण संस्था पोलिस फाऊंडेशन संस्थेचे सचिव बी. एस. जोगदंड व नागपूर चे माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांनी एक वर्षापूर्वी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी  बीड जिल्हा पोलिस दलाच्या संयुक्त सहयोगाने निर्माण करण्यात आलेला  " लाडकी बेटीया "  हा चित्रपट या सोहळ्याची थीम  घेऊन आला आहे असे हरिश्चंद्र वंगे यांनी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन