सुरक्षा रक्षकांना अखेर मिळाला न्याय

        अखेर त्या सुरक्षा रक्षकांना न्यायालयाकडून न्याय 
       न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने सुरक्षा रक्षक आनंदीत 
मुंबई / रमेश औताडे

मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलातील चार सुरक्षा रक्षकांवर प्रशासनाकडून अन्यायकारक पद्धतीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. मात्र औद्योगिक न्यायालयाने या प्रकरणात सत्याचा विजय करत चारही सुरक्षारक्षकांना निर्दोष घोषित केले आहे.

सौ. रत्ना यशवंत लोहकरे, सौ. माया बेचुराम कुंभार, श्री. प्रकाश दत्तू कदम आणि श्री. अर्जुन गोवर्धन उगले या सुरक्षारक्षकांवर बिनबुडाचे आरोप ठेवून प्रशासनाने त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात शिक्षा ठोठावल्या होत्या. या अन्यायाविरुद्ध लढा देत दि. म्युन्सिपल युनियन संघटनेचे सरचिटणीस श्री. रमाकांत बने यांनी औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने सर्व बाजू विचारात घेत चारही सुरक्षारक्षक निर्दोष असल्याचे स्पष्ट करत त्यांना मुक्त करण्यात आले असून, प्रशासनाला या निर्णयाचे कायदेशीर लेखी आदेशही बजावले आहेत.

या निकालाबद्दल सुरक्षा दलातील सर्वच कर्मचारी संघटनेच्या या लढ्याचे कौतुक करत असून, श्री. रमाकांत बने यांच्या न्यायासाठीच्या संघर्षाबद्दल शतशः आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

हा निकाल केवळ चार व्यक्तींचा नव्हे, तर अन्यायाविरोधातील संघटित लढ्याचा विजय आहे, अशी भावना सुरक्षादलातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन