गरिबांच्या हॉटेल वर पालिकेचा हातोडा का ?
गरिबांच्या हॉटेल वर पालिकेचा हातोडा का ?
आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू
मुंबई / रमेश औताडे
कोरोना काळात रुग्णांना उपचार करण्यासाठी पालिकेला आमची हॉटेल चालत होती, मात्र आता आमच्या हॉटेलवर पालिका हातोडा टाकत आहे. गेल्या २० ते २५ वर्षापासून आम्ही प्रशिक्षणार्थी पोलिस, शालेय महाविद्यालय विद्यार्थी यांना माफक दरात तर कर्करोग रुग्णांना मोफत राहण्याची सोय आम्ही करत असताना आमच्यावर अन्याय का ? पंचतारांकित हॉटेल व इतर गगनचुंबी इमारती पालिकेला दिसत नाहीत का ? असा सवाल करत " कुर्ला वॉर्ड हॉटेल आणि गेस्ट हाऊस असोसिएशन ने आपल्या कुटुंबासह आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे.
मुंबई महानगर पालिका एल विभागातील हि हॉटेल रातोरात उभी राहिली नसून २० ते २५ वर्ष सुरू असून माफक दरात व कर्करोग रुग्णांना मोफत उपलब्ध होत असताना आत्ताच हातोडा मारण्याची इच्छा पालिकेला का होत आहे ? मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष वेधून आम्हाला न्याय दिला पाहिजे. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
स्थानिक आमदार दिलीप लांडे व तत्कालीन नगरसेवक प्रकाश मोरे, विजू शिंदे, किरण लांडगे, सोमनाथ सांगळे, अशोक माटेकर, खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घातले असते तर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली नसती. असे अशोशियशन चे अध्यक्ष इमरान अली बहादूर खान, सचिव रवींद्र जगदाळे,उपाध्यक्ष निलेश महाजन, उप खजिनदार अशोक शर्मा, प्रकाश पुजारी, संपादक गिरीश गोसावी यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment