भारतीयांना आता चवीची चिंता नसणार
‘’ ब्लू ड्रॅगन ’’ ची ‘’ सनबीम वेंचर्स ’’ सोबत भागीदारी
मुंबई / रमेश औताडे
जगभरात अस्सल थाई आणि आशियाई खाद्यपदार्थ्यांच्या चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्लू ड्रॅगन ब्रँड ने आता सनबीम वेंचर्ससोबत भागीदारी करत भारतात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. सनबीम वेंचर्स ही एक अग्रगण्य फास्ट मुविंग कन्स्युमर गुड म्हणजेच वेगाने विकली जाणारी उपभोग्य उत्पादनांची वितरण आणि विपणन कंपनी आहे.
२०१९ मध्ये भारतात आपली वितरण प्रणाली तयार केल्यापासून, ब्लू ड्रॅगन भारतीय ग्राहकांच्या आवडीनुसार आपल्या उत्पादनांमध्ये बदल करत आहे. कंपनीने आता भारतात आपला मजबूत पाया तयार केला असून, अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि भारतातील सर्वोत्कृष्ट आशियाई फ्लेवर्सची (चवींच्या) वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
ब्लू ड्रॅगनकडे नूडल्स, सॉस, पेस्ट, मिल किट्स आणि नारळाचे दूध यांसारखी उच्च गुणवत्तायुक्त उत्पादनांची श्रेणी असून भारतीय ग्राहक आता घरच्या घरी सहज आणि चवदार आशियाई पदार्थ तयार करू शकतील.
आता ग्राहकांना खालील प्रकारची उत्पादने सहज उपलब्ध होणार आहेत:
इन्स्टंट कप नूडल्स (६ वेगवेगळ्या प्रकारात) – फक्त ३ मिनिटांत झटपट तयार होणारे स्वादिष्ट नूडल्स.
टॉम यम पदार्थांची श्रेणी – यात टॉम यम पेस्ट, टॉम यम मिल किट, टॉम यम सूप किट आणि टॉम यम नूडल कप्स समाविष्ट आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारे स्वयंपाक करण्याच्या सोयीसाठी तयार करण्यात आले आहेत.
नूडल किट्स आणि करी किट्स – सहज घरी बनविता येणारे अस्सल थाई आणि आशियाई नूडल्स तसेच करी.
ड्राय नूडल्स – खऱ्या थाई चवीचा आस्वाद देणाऱ्या आणि खास निवडलेल्या पारंपरिक थाई नूडल्स
स्वादिष्ट सॉस आणि करी पेस्ट – घरगुती पदार्थांना बनविणार अधिक चवदार
नारळाचे दूध – करी, सूप आणि डेझर्टसाठी उत्तम पर्याय.
ब्लू ड्रॅगनच्या बँकॉक हबचे जनरल मॅनेजर बवॉर्न पकडीसुसुक यांनी व्यवसायाबद्दल आणि भागीदारीबद्दल माहिती देताना म्हटले कि, “ब्लू ड्रॅगनने २०१९ मध्ये भारतात व्यवसायाला सुरुवात केली, त्यानंतर मजबूत वितरण प्रणाली उभारण्यावर आणि स्थानिकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यावर आमचा भर होता.
मात्र, कोविड महामारीमुळे विस्तार नियोजन लांबणीवर पडले. आता आम्ही भारतात मजबूत पाया तयार केला आहे आणि आपली उपस्थिती वाढवण्यास उत्सुक आहोत. भारतीय बाजार उच्च-गुणवत्तायुक्त उत्पादनांकडे वळत आहे. आम्ही या वाढत्या मागणीचा फायदा घेत बाजारपेठेतील प्रमुख कंपनी म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी चांगल्या स्थितीत आहोत.
आमचे उद्दिष्ट भारतीय ग्राहकांशी अधिक मजबूत भावनिक संबंध निर्माण करणे, आमच्या उत्पादनांचे वेगळेपण ग्राहकांना पटवून देणे आणि व्यवसाय वृद्धी करणे आहे. आमचे उत्पादन अस्सलपणा, गुणवत्ता आणि बनविण्यास सोपे यांचे उत्तम संतुलन साधत असल्यामुळे भारतीय ग्राहकांसाठी ही उत्तम निवड ठरेल. आम्ही उत्कृष्ट गुणवत्ता आणि सेवा देण्यास वचनबद्ध असून, भारतातील आमची उपस्थिती आणखी मजबूत करण्यास उत्सुक आहोत.”
२००४ पासून उच्च गुणवत्तापूर्ण उपभोग्य उत्पादनांच्या वितरणात विश्वासार्ह नाव असलेले सनबीम वेंचर्स आता ब्लू ड्रॅगन ब्रँडच्या भारतातील विस्तारासाठी पुढाकार घेत आहे. सनबीम वेंचर्सचे संस्थापक आणि संचालक विकास सिंघल यांनी या ब्रँडला भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी मजबूत वितरण रणनीती आणि ग्राहकांशी थेट संवाद वाढवण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत.
ब्लू ड्रॅगनची उत्पादने आता ५० हून अधिक शहरांमध्ये आणि १५०० हून अधिक प्रीमियम आउटलेट्समध्ये उपलब्ध आहेत. पुढील दोन वर्षांत कंपनी १००% वाढ साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे. ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी, ब्लू ड्रॅगन आपले जाहिरात उपक्रम वाढवत आहे आणि झटपट डिलिव्हरी (क्विक कॉमर्स) प्लॅटफॉर्मवर अधिक प्रमोशन करत आहे. तसेच, हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅटरिंग क्षेत्रासाठी मोठ्या सवलत सुविधा आणण्याची योजना करत आहे, जे मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या व्यवसायांसाठी फायदेशीर ठरेल.
सनबीम वेंचर्सचे संस्थापक विकास सिंघल या भागीदारीविषयी बोलताना म्हणाले कि, “स्वयंपाक सहज, रोमांचक आणि सोपा बनवत भारतीय ग्राहकांना अस्सल थाई आणि संपूर्ण आशियाई पदार्थांची चव देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ब्लू ड्रॅगन हा फक्त सॉस ब्रँड नाही, तर संपूर्ण जेवणासाठी एक संकल्पना आहे. घरी स्वयंपाक करणाऱ्यांसाठी तसेच वेगवान आणि उच्च-गुणवत्तायुक्त स्वयंपाकाचा पर्याय शोधणाऱ्या व्यस्त व्यावसायिकांसाठीही हे आदर्श आहे.”
ब्लू ड्रॅगन आपल्या उत्पादनांचा सर्वोत्तम दर्जा आणि प्रामाणिकता कायम ठेवण्यासाठी थायलंड आणि संपूर्ण आशियातील भागीदार फॅक्टरींसोबत काम करते. कंपनी अन्न सुरक्षेच्या आणि गुणवत्तेच्या कठोर नियमांचे पालन करते. ब्लू ड्रॅगनची उपस्थिती युनायटेड किंगडम, युरोप, उत्तर अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये आहे, जिथे ती अत्यंत काटेकोर निवड आणि तपासणी प्रक्रियेच्या आधारावर उच्च-गुणवत्तेची उत्पादने वितरीत करते. आशियातील स्थानिक साहित्य वापरून, कंपनी खरी आणि शुद्ध पॅन-एशियन चव आणि सुगंध जपते, त्यामुळे ग्राहकांना अप्रतिम खाद्यसंस्कृतीचा अनुभव मिळतो.
Comments
Post a Comment