माजी राज्यपाल कमलाताई गावित सोबत समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य यांनी महिला धोरणावर केली चर्चा

माजी राज्यपाल कमलाताई गावित सोबत
समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य यांची भेट 

मुंबई / रमेश औताडे 


भारताच्या माजी राज्यपाल तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमलाताई गावित यांची समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य यांनी सदिच्छा भेट घेतली. महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या तुपसौंदर्य यांनी या भेटीदरम्यान महिलांचे हक्क, सबलीकरण आणि सामाजिक योगदान यासंदर्भात सखोल चर्चा केली.

या चर्चेत महिलांच्या शिक्षणाचा प्रसार, स्वावलंबनासाठी रोजगारनिर्मिती, आत्मनिर्भरतेसाठी कौशल्यविकास, तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळवता येईल यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी कमलाताई गावित यांनी महिलांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांनी संघटनशक्ती, शिक्षण आणि आर्थिक स्वायत्तता या तीन घटकांवर भर द्यावा, असे सांगितले. तसेच, महिलांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

ही भेट सकारात्मक ठरली असून, भविष्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी संयुक्त उपक्रम राबवण्याचा निर्धार सुनीता तुपसौंदर्य यांनी व्यक्त केला. महिलांना त्यांच्या अधिकारांबाबत जागरूक करण्यासाठी आणि स्वावलंबनासाठी विशेष अभियान राबवण्याचा संकल्पही त्यांनी केला.

पी आर न्यूज  मिडिया नेटवर्क
भारत सरकार नोंदणीकृत 
7021777291

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन