राज्यातील वाहनांना नवीन नंबर प्लेट लावण्याचा कायदा योग्य .....मात्र आमच्या उदरनिर्वाहाचे काय

राज्यातील वाहनांना नवीन नंबर प्लेट लावण्याचा कायदा योग्य .....

मात्र आमच्या उदरनिर्वाहाचे काय 
मुंबई / रमेश औताडे 

सरकारने राज्यातील वाहनांना नवीन नंबर प्लेट लावण्याचा जो कायदा लागू केला आहे तो योग्य आहे. मात्र आमच्या उदरनिर्वाहाचे काय ? असा सवाल नंबर प्लेट आर्टिस्ट वेल्फेअर असोसिएशन ने आझाद मैदानात आंदोलन करत सरकारला केला आहे.

यावेळी बोलताना अशोशियशन चे अध्यक्ष सुनील वर्मा म्हणाले, सरकार जे काही नवीन चांगले करण्यासाठी कायदा करत आहे ते योग्य आहे. मात्र आम्ही दिड लाख नंबर प्लेट आर्टिस्ट बेरोजगार होतील की आत्महत्या करतील याकडे लक्ष देण्यास विसरले आहे.

अशोशियशन चे उपाध्यक्ष शैलेश पटेल म्हणाले, सरकारने या नंबर प्लेट बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट ज्या तीन कंपन्यांना दिले आहे ते जर आम्हा गरीब आर्टिस्ट ला दिले असते तर आमचा संसार उघड्यावर आला नसता. अशोशियशन चे सचिव अमर आठवले म्हणाले, सरकार प्रत्येक वेळी नवी योजना ज्या कंपन्यांना देते त्यापेक्षा जे जून नंबर प्लेट आर्टिस्ट आहेत त्यांना विश्वासात का घेत नाही. इथे भर उन्हात उपाशी पोटी आम्हाला आंदोलन करायची हौस आहे का ?

त्यामुळे सरकाने आमच्या मागण्याचा विचार करावा व आम्हाला बेरोजगार करून त्या संबंधित तीन कंपन्यांना कंत्राट देऊन त्यांना गब्बर  करू नये. आमच्या मुलाबाळांचा विचार करावा. असे सुनील राघवन,भास्कर लिहे,राजन जाधव, नाझीम शेख, कैलास मोतीरावे या पदाधिकाऱ्यांनी केला.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन