महाराष्ट्र राज्य लॉटरीला उभारी देण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती

महाराष्ट्र राज्य लॉटरीला उभारी देण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती 

मुंबई / रमेश औताडे 

महाराष्ट्र सरकारने राज्यातील लॉटरी व्यवसायाला उभारी देण्यासाठी केरळच्या धर्तीवर उपाययोजना सुचविण्यासाठी लोकप्रतिनिधींची एक विशेष समिती गठित केली आहे. या समितीचे अध्यक्ष भाजप नेते आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार असतील. समितीला एक महिन्याच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र लॉटरीचा महसूल गेल्या काही वर्षांत घटला आहे. राज्य सरकारला मिळणाऱ्या महसुलात वाढ करण्यासाठी केरळ सरकारच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून महाराष्ट्रातही तोच नमुना राबविण्याचा विचार सरकारने केला आहे. केरळमध्ये सरकारी लॉटरीतून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो, जो आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कल्याण योजनांसाठी वापरण्यात येतो.

केरळ मॉडेलचा अभ्यास करून महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी कशी करता येईल, यावर शिफारसी करणे.

राज्य लॉटरीच्या प्रचार आणि विक्री व्यवस्थापनात सुधारणा सुचवणे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन लॉटरीच्या माध्यमातून महसूल वाढवण्याच्या उपाययोजना सुचवणे.

बेकायदेशीर लॉटरी आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी प्रभावी धोरण ठरविणे.

समितीला एका महिन्याच्या आत अभ्यास करून आपला अहवाल सरकारपुढे सादर करावा लागेल. या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र राज्य लॉटरी व्यवसायाचे भविष्य ठरवले जाणार आहे.

"महाराष्ट्रात लॉटरी व्यवसायाला शिस्तबद्ध आणि पारदर्शक बनवून त्यातून राज्याच्या तिजोरीत भर घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. केरळचा यशस्वी अनुभव महाराष्ट्रात राबवता येईल का, याचा सखोल अभ्यास करून आम्ही लवकरच अहवाल सादर करू," असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्यातील लॉटरी व्यवसाय पुन्हा बहरात आणल्यास, विशेषतः ग्रामीण भागात रोजगार निर्माण होण्यास मदत होईल आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांसाठी भांडवल उपलब्ध होईल, असा विश्वास शासनाला आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन