ब्ल्यु स्टार स्पोर्ट्स क्लबने आयोजित केले व्याख्यान

        ब्ल्यु स्टार स्पोर्ट्स क्लबने आयोजित केले व्याख्यान 

     मुंबई / रमेश औताडे 

ब्ल्यु स्टार स्पोर्ट्स क्लब, कुर्ला यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवभक्त राजू देसाई यांचे ज्वलंत विचारांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

शिवभक्त राजू देसाई यांनी अपरिचित स्वराज्याचा इतिहास आपल्या खणखणीत आवाजात उपस्थितांसमोर सादर करतांना ज्या घटना शिवकाळात घडलेल्या नाहीत त्या घटना लोकांसमोर सादर करण्यात येऊन चुकीच्या पद्धतीने सांगितल्या जातात अशी भूमिका परखडपणे मांडली. 

यावेळी राजू देसाई यांचा सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. १९९० पासून या क्लबच्या वतीने रक्तदान शिबिर, वह्या व पुस्तकांचे वाटप, आरोग्य शिबीर, स्वच्छता मोहिम, राष्ट्रीय पातळीवर शरीरसौष्ठव स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, शैक्षणिक क्षेत्रातील उतीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार असे सामाजिक विधायक कार्यक्रम क्लब तर्फे हाती घेण्यात येतात.  

शिवजयंती सोहळ्यास क्लबचे अध्यक्ष प्रदीप चौगुले, सचिव संदीप बोरकर, खजिनदार संतोष पावसकर व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन