आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाची क्रांती दिन मशाल दौड
आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाची क्रांती दिन मशाल दौड
मुंबई / रमेश औताडे
आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा, रायगड जिल्हा यांच्या वतीने चवदार तळे क्रांती दिनानिमित्त मुंबई ते माहाड मशाल दौडचे आयोजन करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष नारायण बागडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या दौडीत सहभागी कार्यकर्त्यांनी "सामाजिक परिवर्तनाची ज्योत शेवटच्या थेंबापर्यंत तेवत राहील" असा निर्धार व्यक्त केला.
ही मशाल दौड डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ मध्ये चवदार तळ्यावर केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाची आठवण करून देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
मशाल दौडीत सहभागी कार्यकर्त्यांनी "जय भीम," "समानतेचा जयघोष" आणि "संविधान बचाव" अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. दौडीत युवक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दौडीच्या मार्गावर विविध ठिकाणी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
आंबेडकरी चळवळीतील विविध मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून दिली. नारायण बागडे म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेसाठी दिलेल्या लढ्याची आठवण म्हणून ही मशाल दौड काढण्यात आली आहे.
सत्याग्रहाची ही ज्योत नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हीच खरी आदरांजली आहे." संविधान रक्षणासाठी आणि सामाजिक समतेसाठी अविरत झगडण्याचा संकल्प केला.
Comments
Post a Comment