विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी " आकाश "

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी " आकाश "

मुंबई / रमेश औताडे 

भारतातील प्रमुख शिक्षण संस्था असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड  तर्फे आय आय टी आणि अन्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सर्वोत्तम मार्गदर्शन मिळावे यासाठी  इन्व्हिक्ट्स नावाचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष दीपक मेहरोत्रा यांनी दिली.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जे ई ई परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दर्जेदार आणि प्रभावी शिक्षण देणे हा आहे. एआय कृत्रिम प्रज्ञा च्या आधारित तंत्रज्ञान, वैयक्तिक शिकवणी प्रणाली आणि अत्याधुनिक अभ्यास पद्धतीच्या या उपक्रमात समावेश आहे.  

जे ई ई परीक्षेतील तज्ज्ञ शिक्षकांची टीम, भारतभर ३०  शहरांतील ५०० हून अधिक तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.  
ए आय आधारित वैयक्तिक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण पद्धती, अत्याधुनिक अभ्यासक्रम आणि सातत्यपूर्ण मूल्यांकन, २४ तास डिजिटल स्टडी मटेरियल आणि वेळोवेळी चाचण्या आय आय टी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येते असे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन