श्री यमाई देवस्थानच्या कारभाराविरोधात न्यायालयात याचिका करणार......लेखक कवी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे

श्री यमाई देवस्थानच्या कारभाराविरोधात न्यायालयात याचिका करणार......
लेखक कवी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे 

मुंबई / रमेश औताडे 


श्री यमाई देवस्थानबाबत सह. धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपिल करणार असल्याची माहिती लेखक कवी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कनेरसर ता.खेड.जि.पुणे येथील श्री यमाई देवस्थानबाबत सह.धर्मादाय आयुक्त,पुणे.मा.रजनी क्षीरसागर यांनी बरखास्त विश्वस्त यांचे पाच वर्षापुर्वी मुंबई उच्च न्यायालयाने अपिल फेटाळले होते व त्या आदेशाला आव्हान दिले नसल्याने सह.धर्मादाय आयुक्त पुणे यांनी २० जानेवारी २०२० रोजी दिलेला आदेश अंतिम होत असल्याने रद्द करता येणार नाही असा आदेश ११ मार्च २०२५ ला दिला होता. 

    सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे व दिलीपराव माशेरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेमध्ये मध्ये मउच्च न्यायालयाने २० जानेवारी २०२५ रोजी आदेश देऊन  सह.धर्मादाय आयुक्त पुणे यांचेकडे अर्ज दाखल करून दिलेला आदेश रद्द करण्याची मागणी करा व सहा आठवड्यात निर्णय देण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार सह धर्मादाय आयुक्त यांनी निर्णय दिला आहे.

पुर्वीच्या आदेशात विश्वस्त बरखास्ती व प्रशासक कमिटी नियुक्ती हे दोन मुद्दे होते. बरखास्त विश्वस्त यांचे मुंबई उच्च न्यायालयाने अपिल फेटाळणे ही बाब टाव्हरे व माशेरे यांनी रिट याचिकेत मांडली होती. सह धर्मादाय आयुक्त यांनी पाच वर्षापुर्वीच्या निर्णयात प्रशासक कमिटी नियुक्ती ही पुढील आदेशापर्यंत असे स्पष्ट नमुद केले आहे.

सह.धर्मादाय आयुक्त पुणे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा कोणताही संदर्भ न देता, गुणवत्ता व प्रशासक कमिटी कामकाजाबाबतच्या कागदपत्रांचे अवलोकन न करता, प्रशासक कमिटीने कोणतेही म्हणणे मांडलेले नसताना फक्त बरखास्त विश्वस्तांचे उच्च न्यायालयाने अपिल फेटाळणे या एकाच मुद्दयावर दिलेल्या निर्णयाविरोधात सोमवार २४ मार्च रोजी ॲड.वासिम सामलेवाले यांचे वतीने मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल करणार असल्याचे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन