झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
मुंबई / रमेश औताडे
पश्चिम रेल्वे हद्दीत असलेल्या झोपडीधारकांचे पुनर्वसन व पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची भेट घेण्यात आली.
इंदिरानगर झोपडपट्टी (आंबोली फाटक), सुभाष नगर झोपडपट्टी (जोगेश्वरी पूर्व) आणि राम मंदिर झोपडपट्टी (गोरेगाव पूर्व) या भागातील नागरिकांना रेल्वे प्रशासनाने बेघर करण्याची कारवाई सुरू केली आहे. या कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात तात्काळ रेल्वे प्रशासन व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले. खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जांभळे, मिल स्पेशल भाट आणि अविनाश भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले. झोपडीधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे आणि झोपडपट्टी धारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment