महिलांवरील अन्याय अत्याच्यारासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महिलांवरील अन्याय अत्याच्यारासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई / रमेश औताडे
महाराष्ट्रातील महिलांवरील वाढत्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांवर आळा घालण्यासाठी कडक कायदे करण्यात यावेत, अशी मागणी ऑल इंडिया महिला इम्पॉवरमेंट पार्टीच्या मुंबई महाराष्ट्र अध्यक्षा सुनिता मोहन तुपसौंदर्य यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.
तुपसौंदर्य यांनी आपल्या पत्रात राज्यातील जोगेश्वरी, जालना, लातूर, अंधेरी, पुणे आणि अन्य ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे नमूद केले आहे. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाईसाठी सरकारने तातडीने कडक कायदे लागू करावेत, अशी त्यांची मागणी आहे.
राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज असून, सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा प्राधान्याने उपस्थित करून कायदे करण्यासाठी पावले उचलावीत, असे त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे.
महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आवश्यक असून, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ऑल इंडिया महिला इम्पॉवरमेंट पार्टीने केली आहे.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
भारत सरकार नोंदणीकृत
बातम्यांसाठी संपर्क करा
रमेश औताडे 7021777291
Comments
Post a Comment