शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

मुंबईतील आझाद मैदानातून सरकारला दिला इशारा

मुंबई / रमेश औताडे 

शेतकऱ्यांना अंधारात ठेवत मनमानी कारभार करणाऱ्या सरकार विरोधात बुधवारी आझाद मैदानात राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सरकारने जर मनमानी करत हा शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी बळाचा वापर केला तर जशास तसे उत्तर देऊ. असा इशाराही शेतकऱ्यांनी  सरकारला दिला आहे.

यावेळी आमदार सतेज पाटील, जयंत पाटील, दिलीप सोपल, अंबादास दानवे, सचिन अहिर, प्रवीण स्वामी,राजेश विटेकर,राजू नवघरे,जयंत आसगांवकर, कैलास पाटील,अरुण लाड, विश्वजीत कदम,राजू शेट्टी, माजी आमदार संजय घाटगे,के.पी.पाटील,कॉम्रेड उमेश देशमुख आंदोलनात सहभागी झाले होते.

रोजगार, महागाई, सिंचन, शेतकरी आत्महत्या या प्रमुख मुद्यांकडे लक्ष न देता आपल्याच मर्जीतील कॉन्ट्रॅक्टरांचे भले व्हावे यासाठी सरकार ने शक्तिपीठ महामार्ग " लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना " म्हणून सुरू केली  आहे. असा आरोप करत बुधवारी आझाद मैदानावर हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने जमिनी घेऊन हा महामार्ग तयार होत आहे. शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न व कर्जमुक्ती या विषयावर कार्य करण्यापेक्षा रस्ते विकास कशासाठी ? असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी केला. या महामार्गासाठी एका किलोमीटरला १०७ कोटी रुपये खर्च येणार आहे. उरलेले ७० कोटी रुपये कोणासाठी ? हे आम्हाला सरकारला विचारायचे आहे. जमीन आम्ही देणार पण योग्य मोबदला दिला तरच. असे सांगत शेतकरी आक्रमक झाले होते.

 मुंबईतील आझाद मैदानात बुधवारी झालेले हे आंदोलन आता अजून जिल्हाजिल्यात पेटणार आहे. असे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्र चे समन्वयक गिरीश फोंडे यांनी सांगितले.या आंदोलनाला शक्तिपीठ महामार्ग समितीला समर्थन करण्यासाठी दहा ते बारा आमदार मैदानात आले होते.अशी माहिती बुधगावचे शेतकरी मित्र अभिजीत जगताप यांनी दिली.





      

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन