आईच्या हत्या प्रकरणात २१ वर्षांनंतरही न्यायासाठी आक्रोश

हत्या प्रकरणात २१ वर्षांनंतरही न्यायासाठी आक्रोश

मुंबई / रमेश औताडे 


सुप्रसिद्ध डॉ. आशा गोयल यांच्या अमानुष हत्येला २१ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या कुटुंबियांना अद्याप न्याय मिळाला नाही. त्यांची कन्या रश्मी गोयल मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेत,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून न्यायची मागणी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना रश्मी गोयल म्हणाल्या की, २२ ऑगस्ट २०२३ रोजी माझ्या आईची यांची मुंबईत माझ्या मामाच्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येतील पुरावे स्पष्ट असूनही, न्याय प्रक्रियेमध्ये अपयश आले आहे. रक्ताने माखलेले कपडे, डीएनए तपासणीतील साक्ष, आणि आरोपींच्या कबुलीजबानी नंतरही न्यायप्रक्रिया रेंगाळलेली आहे.

माझ्या आईने अनेक गरजु महिलांना आरोग्यसेवा दिली.  टोपिवाला मेडिकल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून स्त्रीरोगतज्ञ म्हणून कौतुकास्पद कार्य केले. त्यांचे कार्य पाहून कॅनडा देशात सन्मान झाला. २००६ मध्ये या प्रकरणी एका आरोपीने कबुली दिली असताना  न्यायप्रक्रिया रेंगाळली आहे. आता आम्ही न्याय मागून थकलो आहोत, परंतु आईसाठी आमचा संघर्ष थांबणार नाही."असे रश्मी गोयल यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन