२३ वर्षाच्या संघर्षात ७१ कामगारांचे वृद्धापकाळाने निधन..........जिवंत कामगारांना मेल्यावर थकबाकी देणार काय ?
कामगारांना मार्गदर्शन करताना जेष्ठ कामगार नेते शांताराम भोईर
मुंबई / रमेश औताडे
तळोजा येथील ट्रान्सपॉवर इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीतील १७५ कामगारांनी २४ वर्षे सेवा दिल्यानंतरही त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. कंपनीकडून तब्बल ९ कोटी रुपयांची देणी प्रलंबित असून, कामगारांनी अनेक वेळा मागणी करूनही प्रशासन आणि सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.असे ट्रान्सपॉवर कामगार संघटनेते जेष्ठ कामगार नेते शांताराम भोईर यांनी सांगितले.
या लढ्यात आतापर्यंत ७१ कामगारांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत मिळालेली नाही, कंत्राटी कामगार ३२५ व कायम कामगार १७५ असे ५०० कामगार न्याय मागत आहेत. ८ कोटी ८६ लाख रुपये नियमानुसार मंजूर होऊनही अद्याप दिले गेले नाहीत.कंपनीच्या जमिनी व इतर प्रॉपर्टी चा लिलाव होत नाही. मुंबईतील दादर इथल्या कार्यालयाचे खाजगीकरण केले आहे. नागपूर येथे २१ एकर जमीन आहे. ती विकली तर कामगारांची हक्काची देणी मिळू शकतात. असे शांताराम भोईर यांनी सांगितले.
ट्रान्सपॉवर इंजीनियरिंग लिमिटेड या कंपनीमधून १७५ कायम कामगारानं पैकी ७१ कामगार मयत झाले. उच्च न्यायालय लिक्विडेटर कार्यालय लक्ष देत नाही. कंपनीची मालमत्ता असूनही लिलाव करण्यासाठी टाळाटाळ होत आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत सर्वांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अशी माहिती ट्रान्सपॉवर कामगार संघटनेचे नेते शांताराम भोईर यांनी दिली.
ट्रान्सपॉवर कंपनीतील या कामगार आपल्या हक्कासाठी २४ वर्ष लढत आहेत. असे सांगत शांताराम भोईर यांनी स्पष्ट केले की, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कामगार लवकरच पुढचे पाऊल उचलतील. जर सरकारने तातडीने हस्तक्षेप केला नाही, तर तीव्र लढा उभारला जाईल. मुख्यमंत्र्यांनी तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय द्यावा.अशी मागणी शांताराम भोईर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment