२२ लाख गुंतवणूकदारांचे ३७५० कोटी बुडवणाऱ्या समृद्ध जीवन कंपनी विरोधात मुंबईत आझाद मैदानात आंदोलन



मुंबई / रमेश औताडे 


महाराष्ट्रातील २२ लाख गुंतवणूकदारांचे ३७५० कोटी रुपये १० वर्षापासून समृध्द जीवन कंपनी कडून मिळाले नसल्याने मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्याचा इशारा जन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष शाहूराज माने यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

या सर्व प्रकरणी MPID कायद्याअंर्तगत पुर्ण सेशन कोर्टात या  कारवाई सुरू आहे. समृद्ध जीवन कंपनीचा  मालक महेश मोतेवार यांच्या सर्व मालमत्ता ०२ ऑगस्ट २०११ रोजी महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात घेण्यात आल्या. याच्यावर अवसायक (लिक्वीडेटर) ची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या सर्व मालमत्ता सक्षम प्राधीकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे याचा नियुकी करून सर्व मालमत्ता त्याच्या निगराणीमध्ये ठेवण्यात आल्या असताना MPID च्या यादीमध्ये ताब्यात घेण्यात आलेली रॉल्स रायस कार, WB 02 AB 0123 या क्रमांकाची गाडी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे प्रशांत कोरटकर यांच्याकडे कशी गेली ? असा सवाल शाहूराज माने यांनी यावेळी केला.

तसेच महेश मोतेवार सात वर्षाचा कारावास भोगुन बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा दौलत प्राईड नावाने नवा फसवेगीरीचा व्यवसाय सुरु करत गुंतवणूकदारांना फसवत आहे. दौलत प्राईड या कंपनीत मध्ये गुंतवणूक केली तरच समृद्धी जीवन ची मॅच्युरीटी देण्यात येईल असे सांगुन पुन्हा एकदा गुतवणूकदारांना करोडो रुपयाचा गंडा घातला आहे. या भामट्यावर सरकारने कारवाई करावी यासाठी ही आंदोलन करण्यात येत असल्याचे शाहूराज माने यांनी सांगितले 



Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन