सरपंच हत्याकांड प्रकरणी ग्रामपंचायत बंद यशस्वी

सरपंच हत्याकांड प्रकरणी ग्रामपंचायत बंद यशस्वी

मुंबई / रमेश औताडे 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्यामुळे दोषीवर कडक कारवाई करावी व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने गुरुवारी एक दिवस राज्यभरातील ग्रामपंचायत बंद करण्याचे आंदोलन केले.

राज्यातील अनेक जिल्ह्यांतील बहूतांश सर्व ग्रामपंचायतीने बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे . राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतीमध्ये स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती बंद राहिल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे निर्माण झालेला असंतोष ग्रामीण महाराष्ट्रात दिसून आला. तसेच सरपंच व त्यांचे सहकारी कर्मचारी हेही त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायद्यासाठी आक्रमक झाल्याचे चित्र राज्यभर दिसून आले.

सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचने नुसार राज्यातील सर्वच विभागात प्रत्येक जिल्ह्यात ग्रामपंचायतीने उत्स्फूर्तपणे बंद पळून त्याला चांगला प्रतिसाद दिला. राज्यातील सरपंच उपसरपंच कर्मचारी काही गावातील गावगुंडा पासून भयभीत झालेले आहेत समाजसेवा करताना अनेक जण यांच्या दबावाखाली काम करत आहेत तेलंगणा व राजस्थान मधील न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे सरपंचाच्या फिर्यादी नुसार शासकीय कामातील अडथळ्याचा गुन्हा गाव गुंडावर दाखल करावा अशी मागणी केली.

यावेळी अध्यक्ष जयंत पाटील यांनी शासना कडे विविध मागण्या केल्या यात सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी कायदा असावा , ग्रामसभेला काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते यामुळे प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण असावे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी देण्यात यावी संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी तसेच त्यांचे गावमध्ये स्मारक उभा करण्यात यावे सरपंचाला भविष्यात सुरक्षितता लाभण्या साठी त्यांना पेन्शन योजना तसेच त्यांना विमा संरक्षण शासना तर्फे देण्यात यावे .

 ग्रामसभा ही सर्व ग्रामस्थांसाठी खुली असते त्यावेळेस सर्व ग्रामस्थ तेथे सहभाग घेतात यामुळे ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये गावातील लोकांना कायद्याने प्रवेश बंद असावा यावेळी भोसरे व चोभेपिंपरी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन