सावित्रीबाई फुले जयंती निमित्त धान्य वाटप
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त धान्य वाटप
मुंबई / रमेश औताडे
महिलांच्या आयुष्यात शिक्षण किती महत्वाचे असते याची जाणीव करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एम ए पी पार्टी च्या वतीने विधवा, गरीब महिलांना धान्य वाटप करण्यात आले.
ऑल इंडिया महिला ईम्पॉवरमेंट पार्टीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष नोवेरा शेख तसेच महाराष्ट्र व मुंबई अध्यक्ष सुनिता तूप सौंदर्य यांनी सावित्रीबाईंचे विचार कसे होते याबाबत महिलांना मार्गदर्शन केले.
हे धान्य यांना कायमचे पुरणार नाही. मात्र देण्याची भावना समाजात रुजली पाहिजे यासाठी आम्ही फुल ना फुलाची पाकळी देऊन या महिलांना सहकार्य करत आहोत. महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन देणे, ग्रामीण भागातील महिलांना दूरवरून पाणी आणावे लागते त्यासाठी बोअरवेल ची सोय करून ग्रामीण भागातील महिलांना पार्टीने सहकार्य केले आहे असे सुनीता तूप सौंदर्य यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment