जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पादुका पालखी सोहळा आणि गुरू माता पिता कृतज्ञता सोहळा
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पादुका पालखी सोहळा आणि गुरू माता पिता कृतज्ञता सोहळा
मुंबई / पी आर न्यूज
।। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे आगमन ।।
।।होती संतांच्या भेटी । सांगू सुखाची या गोष्टी ।।
या संत वचनाप्रमाणे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ३७५ वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त नूतन पादुका तयार करून , ह भ प महर्षी राहुल महाराज ताम्हाणे आणि ह भ प भागवताचार्य दिनेश महाराज औटी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदीप ट्रस्ट, श्री कृतज्ञता ट्रस्ट व सद्गुरु ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव सामाजिक सेवा ट्रस्ट यांच्या नियोजनात गुरूवार १३ फेब्रुवारी २०२५ ते रविवार १६ फेब्रुवारी २०२५ रोजी गुरू माता पिता कृतज्ञता आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पादुका पालखी सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्यामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू समवेत जगद्गुरु तुकोबारायांचे चौदावे वंशज जगद्गुरु कृपांकित हभप भानुदास महाराज मोरे व श्री ज्ञानेश्वर महाराज सेवा संस्थान कमिटी श्रीक्षेत्रआळंदी समवेतअध्यक्ष श्री योगी निरंजनाथजी , व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर साहेब
व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती श्रीक्षेत्र पंढरपूर
व जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संस्थान साधना भूमी श्री क्षेत्रभंडारा डोंगर समवेत धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष ह भ प अक्षय महाराज भोसले, नादब्रह्म पखवाज क्लासेस संस्थापक ह भ प कृष्णा महाराज झोडगे,ओम श्री श्री १००८ धर्मसंधू महामंडलेश्वर स्वामी शांतानंद सरस्वती महाराज आणि संपूर्ण शिष्य परिवार या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात श्री संतोष ताम्हाणे , श्री देवांश शरद नाईक , श्री ममीत चौगुले आणि गोरक्षक शिवशंकर स्वामी यांना कृतज्ञता समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच , शिक्षक रत्न पुरस्कार देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहेत.
या सोहळ्याचे नियोजन सर्वेश झोडगे , सोमनाथ शिरसाट , हरिदास जायभाये ,बाळशिराम गवांदे , सागर गवांदे , भाऊसाहेब आरोटे , सागर आरोटे , संकेत करंडे आणि समस्त वारकरी संप्रदाय करीत आहेत.
पंचक्रोशीतील सर्वच भाविकांनी तुकोबारायांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक श्री राहुल कचरू ताम्हाणे यांनी केले.
P R NEWS
7021777291 - संपादक रमेश औताडे
Comments
Post a Comment