देशभरातील कर्मचाऱ्यांच्या वाढीव पेन्शन बाबत महत्वपूर्ण बैठक

देशभरातील कर्मचाऱ्यांच्या वाढीव पेन्शन बाबत महत्वपूर्ण बैठक


पी आर  न्यूज / मुंबई


केंद्रीय भविष्य निर्वाह निधी विभागाचे आयुक्त यांच्या सोबत कामगार प्रतिनिधींची एक महत्वाची बैठक दिल्ली येथे  झाली. या बैठकीत देशभरातील कर्मचाऱ्यांच्या वाढीव पेन्शन बाबत महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

" ईपीएफ-९५ वाढीव पेन्शन " देण्याबाबत लवकरच श्रम मंत्रालयाला केंद्र सरकारकडून निर्देश प्राप्त होण्याची शक्यता आहे. निर्देश प्राप्त झाल्यानंतरच वाढीव पेन्शन लागू होईल.

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या शिष्टमंडळाची १० जानेवारी २०२५ भेट झाली. कामगार नेते कॉम्रेड मोहन शर्मा, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर, बैजनाथ सिंग या कामगार नेत्यांच्या सोबत दिल्लीचे अप्पर केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त चंद्रमौली चक्रवर्ती या बैठकीत उपस्थित होते.

" ईपीएफ-९५ वाढीव पेन्शन " लागू करण्याबाबत देशभरातील सूट दिलेले ट्रस्ट (Examtat trust) मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन लागू करण्याबाबत श्रम मंत्रालय केंद्र सरकारकडून निर्देश प्राप्त होणार आहेत. निर्देश प्राप्त झाल्यानंतरच वाढीव पेन्शन लागू करण्याबाबत पुढील कार्यवाही होईल अशी माहिती त्यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन