महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जनसंपर्क अभियान
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जनसंपर्क अभियान
मुंबई / रमेश औताडे
स्वराज्य जनसंपर्क अभियानाला नवी मुंबई कोपरखैरणे येथून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबईत असे अभियान होणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही जनतेच्या अपेक्षा आता या अभियानातून पूर्ण करणार असल्याचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी यावेळी दिली.
या अभियाना अंतर्गत कोपरखैरणे येथील नागरिकांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली व विविध समस्या जाणून घेतल्या. तसेच या समस्या सोडवण्यावर आगामी काळात निश्चित भर देऊन ही कामे मार्गी लावू अशी ग्वाही अंकुश कदम यांनी यावेळी दिली. राज्यभरातून तरुणाचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष
विनायक जाधव यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अध्यक्ष उमेश जूनघरे, युवा जिल्हा अध्यक्ष मयूर धुमाळ व शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment