प्रायव्हेट हॉस्पीटल मध्ये मोफत उपचार कसे घेणार
" आयुष्मान भारत " आरोग्य कार्ड साठी " स्माईल फाऊंडेशन " गरीब रुग्णांचा खिसा खाली करू नका ; सरकारला दिले निवेदन मुंबई / रमेश औताडे मोफत आरोग्य सेवेचा लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आयुष्मान भारत’ योजनेत मोठा तांत्रिक गोंधळ झाल्याने नागरिकांचे कार्ड अडकून पडले असल्याने महागड्या उपचारांसाठी स्वतःचाच खर्च करावा लागत आहे. नोंदणीतील त्रुटींमुळे अनेक गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येत आहे. या पार्श्वभूमीवर स्माईल फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने सरकारला निवेदन देत गरीब रुग्णांचा खिसा खाली करू नका अशा आशयाचे निवेदन दिले आहे. ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना ५ लाखांपर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा दिली जाते. मात्र, अनेक नागरिकांचे नाव ऑनलाइन सिस्टममध्ये तांत्रिक बाबींमुळे योग्य प्रकारे नोंदवले गेले नाही. परिणामी, मोठ्या रुग्णालयांमध्ये या कार्डशिवाय उपचार घेणे कठीण जात आहे. आरोग्य विभागाच्या यंत्रणेने गरजूंना या कार्ड चा उपचारासाठी उपयोग होण्यासाठी गांभीर्याने पावले उचलण्याची...