Posts

Showing posts from April, 2026

दलित पॅंथरच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

Image
दलित पॅंथरच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मुंबई / रमेश औताडे  दलित पॅंथर या संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन कामोठे, नवी मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी भूषवले, तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. घनश्याम भोसले होते. आरपीआय कामोठे शहराध्यक्ष ॲड. मंगेश धीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. समाजावरचा अन्याय थांबत नाही, त्यामुळे सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन दलित पॅंथरमध्ये सहभागी होण्याची गरज आहे.असे असे मुंबई अध्यक्ष प्रमोद निकम यांनी सांगितले. नगरसेवक हॅप्पी सिंग, उद्योजक दयानंद , प्रमोद लोखंडे, सुप्रिया बनसोडे, अरविंद मोरे, मुजीबभाई शेख, रमेश गवारी, सखाराम पाटील, अंकुश आवडे, आकाश बोंडे, तसेच मनोज गायकवाड (कोकण प्रांत अध्यक्ष) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई अध्यक्षपदी प्रमोद निकम तर  रायगड जिल्हाध्यक्षपदी सुदर्शन साबळे यांची नियुक्ती केली. १९७२ साली पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांनी स्थापन केलेल्या या संघटनेने सामाजिक न्याय, समानता आणि स्वाभिमानासाठी मोठे योगदान दिले...

नागरिकांना न्यायासाठी न्यायालयातच जावे लागत असेल तर प्रशासन कशासाठी !

Image
नागरिकांना न्यायासाठी न्यायालयातच जावे लागत असेल तर प्रशासन कशासाठी !  अखेर धरणे आंदोलन सुरू  मुंबई / रमेश औताडे  पुणे जिल्ह्यातील खेड येथील तत्कालीन तहसीलदार यांनी एका प्रकरणी भोगावटा एकची कार्यवाही अनाधिकाराने करूनही कारवाई नाही. महसुल विभाग, ज ५ यांनी तीन पत्र एक वर्षापुर्वी देऊनही जिल्हाधिकारी पुणे यांचा अहवाल शासनास जात नाही या व इतर विषयांबाबत प्रशासन दिरंगाई करीत असल्याने सामाजिक कार्यकर्ते, कवी-लेखक अशोकराव टाव्हरे यांनी  जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे.  सुदाम बोरकर, शरद टाकळकर, गणेश मोरे, प्रदीप कर्पे, दत्तात्रय सावंत, किरण बाविस्कर हे बाधित नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने अनेक नागरिक समस्या घेऊन येतात. काहींना अनेक हेलपाटे मारूनही तहसील व प्रांत कार्यालय खेड दाद देत नाही. १५५ अन्वये चुकीचे आदेश दिल्याबाबत महसुलमंत्री व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केलेल्या एका,तक्रारींमध्ये उपविभागीय अधिकारी, खेड यांनी जुलै २०२५ मध्ये १० दिवसात अहवाल देण्यासाठी तहसीलदार खेड यांना पत्र देऊनही अद...

आपल्याला हवी हवीशी वाटणारी " हे काय नवीन " मालिका

Image
आपल्याला हवी हवीशी वाटणारी " हे काय नवीन " मालिका मुंबई / रमेश औताडे  आपल्याशा वाटणाऱ्या कथाकथानाचे हक्काचे व्यासपीठ झी 5 वर  'हे काय नवीन?’ या नवीन ओरिजनल सिरीजचे आता स्ट्रिमिंग होणार असून या सिरीजमध्ये खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार असलेल्या उमेश कामतने आदित्य तर प्रिया बापट हिने रमाची भूमिका साकारली आहे. ही मालिका आकर्षण, आराम आणि प्रामाणिकपणाचा एक अतिरिक्त पदर उलगडते जो केवळ एक वास्तविक बंध निर्माण करणारा आहे.  वरुण नार्वेकर दिग्दर्शित, या सिरीजमध्ये आयुष्यातील मोठे टप्पे गाठल्यानंतर काय घडते यावर एक प्रेमळ, जीवनाच्या पैलूवरील भाष्य आहे. प्रिया बापट, उमेश कामत, शुभांगी गोखले, उदय टिकेकर, सुयोग गोऱ्हे, राजसी भावे, ओमकार गोवर्धन, तन्वी कुलकर्णी आणि पायल जाधव अशा उत्कृष्ट कलाकारांच्या टीमसह, ही सिरीज रमा आणि आदित्य यांचे चित्रण करते, ज्यांचे आयुष्य सुरळीत, पुरेसे नीट जगलेले आहेत.  दैनंदिन जीवनाच्या पार्श्वभूमीवर हे काय नवीन ? ही सिरीज अनेकदा दुर्लक्ष करत असलेल्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये, मूक विरामांमध्ये, बदलत्या स्वप्नांमध्ये आणि दीर्घकालीन नातेसंबं...