ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर
मुंबई / रमेश औताडे
फेस्कॉन प्रादेशिक विभागाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे काल संघाच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. निखिल यांच्या हस्ते झाले. सुरुवातीला सर्व डॉक्टर व सहकारी कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी प्रास्ताविक केले. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मधुमेह, रक्तदाब, डोळे तपासणे, त्वचारोग, कान नाक घसा तपासणी, ईसीजी, हाडाची तपासणी, इत्यादी आजारांच्या तपासण्या करून मोफत औषधे देण्यात आली.
शिबिरामध्ये डॉ. यश, डॉ. मुदिता, डॉ. पलख, डॉ. प्रज्ञेश, डॉ. आदिती, डॉ. शिवानी व हॉस्पिटलचे इतर कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे मेडिकल सोशल वर्कर समाधान माळी यांनी यासाठी उत्तम सहकार्य केले. या शिबिरामध्ये सुमारे १०० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेऊन शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी संघाचे सचिव जगदीश एकावडे, खजिनदार महादेव पाटील, सहसचिव राजेंद्र कदम, उपाध्यक्ष सीमा बोराडे, लक्ष्मण गोळे, कमिटी मेंबर जगन्नाथ देसाई, मंगला मानधने, राजाराम घोलप तर माजी पदाधिकारी राम काजरोळकर, मारुती कदम, विठ्ठल गव्हाणे, विष्णुदास मुखेकर, बळवंत पाटील, सुभाष बारवाल, महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
संपादक 7021777291
Comments
Post a Comment