मुक्या जीवांसाठी एक अनोखा उपक्रम
मुंबई / रमेश औताडे
शहरातील मुक्या प्राण्यांना मदतीचा आधार मिळावा, या उद्देशाने प्राणीप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधत “महजॉंग पॉज विथ अ पर्पज” या सामाजिक संस्थेच्या वतीने एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
भटकी कुत्रे व मांजरे यांच्यासाठी अन्नपुरवठा, बचावकार्य, वैद्यकीय उपचार, पुनर्वसन तसेच नसबंदी यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांद्वारे या कार्यक्रमातून मुक्या जीवांच्या संरक्षणाचा संदेश देण्यात आला. मुंबईतील बांद्रा येथे आयोजित या उपक्रमाचे आयोजन शीतल झुबीन आणि तनिका ठक्कर यांनी केले होते.
या उपक्रमातून जमा होणारा संपूर्ण निधी मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या फरिदा बजाज यांच्या “फर-रिडाज अॅनिमल अॅण्ड रिहॅबिलिटेशन ट्रस्ट” या संस्थेला देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे समाजातील प्रत्येक घटकाने मुक्या जीवांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढे यावे, असा सकारात्मक संदेश देण्यात आला असून प्राणीमित्रांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
संपादक 7021777291
Comments
Post a Comment