डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत अनुयायांना पाणी वाटप


मुंबई / रमेश औताडे 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया एम्पॉवरमेंट परिषद आणि सिद्धिविनायक सेवा संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे नेतृत्व संस्थेच्या अध्यक्ष सुनिता तूपसौंदर्य यांनी केले. वाढती गर्दी आणि सततची वाहतूक यामुळे भाविकांना पिण्याच्या पाण्याची विशेष गरज भासते. हे लक्षात घेऊन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर चैत्यभूमी परिसरात फिरून भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले.

पाणी वाटपाच्या या सेवेत महिलांसह युवकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन दरवर्षी विविध सेवाकार्ये राबवण्याचा संस्थेचा संकल्प असून, यंदाही त्यांनी शिस्तबद्धपणे सेवा दिली. ‘‘बाबासाहेबांच्या तत्त्वांना मानणाऱ्यांची सेवा करण्याचा आम्हाला अभिमान आहे,’’ असे अध्यक्ष सुनिता तूपसौंदर्य यांनी यावेळी सांगितले.

भाविकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, गर्दीच्या वातावरणात थंड पिण्याचे पाणी मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. संस्थेकडून अशा सामाजिक सेवांनी चैत्यभूमीतील वातावरण अधिक सुसंस्कृत आणि सेवाभावी बनत असल्याची भावना अनुयायांनी व्यक्त केली.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 
7021777291

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन