महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय आदरांजली
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय आदरांजली
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर रोजी असलेल्या महा परिनिर्वाण दिनानिमित्त दोस्त कला मंच तर्फे दरवर्षीप्रमाणे हर सवाल का जवाब...बाबासाहब ! हा लक्षवेधी संगीतमय आदरांजली कार्यक्रम बुधवार ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी दादर माटुंगा कल्चरल सेंटर मध्ये संपन्न झाला.कार्यक्रमाची संकल्पना संयोजन रवि भिलाणे यांचे असून संजय शिंदे,भानुदास धुरी,ज्योती बडेकर,अशोक विठ्ठल जाधव,राजू शिरधनकर,संदेश गायकवाड,प्रशांत राणे आदींनी या कार्यक्रमाचे संयोजन केलं. आहे.
जेष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या शब्दात माईसाहेब आंबेडकर यांचे मनोगत,महात्मा फुले,शाहू महाराज यांचे व्यक्तिमत्व सादरीकरण,बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचे चित्रीकरण करणाऱ्या दिवंगत नामदेव व्हटकर यांच्या कुटुंबियांचा मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान हे यंदाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
त्याच बरोबर विठ्ठल लाड आणि सहकाऱ्यांचे आदिवासी अस्मिता नृत्य,सुनंदा नेवसे पाटील,चित्रपट दिग्दर्शक महेश बनसोडे,अभिनेत्री दिपाली बडेकर, जयवंत हिरे, छायाताई कोरेगावकर, संदेश शालिनी संभाजी कर्डक,निनाद सिद्धये, बाळासाहेब उमप गजेंद्र मांजरेकर, मंजुषा गोवर्धन पेशवे, अदिती पोपट सातपुते, अनहद संध्या संदेश आदी कार्यकर्त्या कलावंतांनी सादर केलेल्या कविता,गाणी,नाट्यछटा,राकेश सुतार निर्मित फुले शाहू आंबेडकर यांचे चित्रशिल्प अशा बहुविध कला प्रकाराद्वारे बाबासाहेबांना सांगीतिक आदरांजली अर्पण केली गेली.
राजा आदाटे,काशिनाथ निकाळजे,सुनील साळवे,प्रदीप सूर्यवंशी, पोपट सातपुते,संध्या पानसकर,संजीवनी नांगरे,बाळासाहेब पगारे, ऍड. चित्रा गोसावी,शैलजा सावंत,विजय त्रिभुवन, ऍड.ज्योत्स्ना बनाले,विक्रांत लव्हांडे, प्रकाश महिपती कांबळे,नसीमा शेख,अश्विन कांबळे,सतीश जळगावकर आदींनी प्रचंड मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 24 × 7
संपादक 7021777291
.
Comments
Post a Comment