केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यावर पीएचडी
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
रमेश औताडे / मुंबई
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे २०१४ ते २०२४ या कालावधीतील रस्ते वाहतूक विकास या विषयावर प्रबंध लिहून नागपुर येथील प्रशांत हातबुडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून पीएचडी करीत आहेत. त्यासाठी लेखक अशोकराव टाव्हरे लिखित " विकासाचा राजमार्ग " हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरले आहे.
नागपुर येथे टाव्हरे व हातबुडे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली. गडकरी यांनी दोघांचेही कौतुक केले. विकासाचा राजमार्ग या पुस्तकाच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाची विकासकामे जनतेसमोर गेली ही बाब अभिनंदनीय आहे, तसेच प्रशांत हातबुडे यांनी दहा वर्षातील कार्यावर प्रबंध लिहून पीएचडी करीत आहे याचे विशेष कौतुक गडकरी यांनी यावेळी केले.
प्रशांत हातबुडे यांना पीएचडी प्रबंधासाठी गडकरींच्या कार्याची माहिती आवश्यक होती. त्यासाठी त्यांना गडकरी यांच्या नागपुर येथील जनसंपर्क कार्यालयाने विकासाचा राजमार्ग हे पुस्तक दिले होते असे टाव्हरे यांनी सांगितले. विकासाचा राजमार्ग या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित असून हायवे ऑफ डेव्हलपमेंट या इंग्रजी पुस्तकाच्या दोन आवृत्ती प्रकाशित आहेत.
Comments
Post a Comment