४ वर्षांची आरंभी UPSC भवनात!
४ वर्षांची आरंभी UPSC भवनात!
देशसेवेच्या स्वप्नासाठी सुरुवात लहानपणापासूनच
मुंबई / रमेश औताडे
अवघ्या ४ वर्षांची असलेली कुमारी आरंभी अमित साळुंखे हिने दिल्लीतील संघ लोक सेवा आयोग (UPSC) मुख्यालयासमोर उभी राहून देशसेवेचे स्वप्न जपत खास फोटो काढला आहे. वडील अमित दिपक साळुंखे (संपर्क: 9664199997) यांच्यासोबत दिल्लीला गेलेल्या आरंभीने या भेटीच्या वेळी UPSC समोरील विजयी 'V' चिन्ह दाखवत तिची इच्छाशक्ती दर्शवली.
आरंभी SR. KG Holy Cross High School, कुर्ला – मुंबई येथे शिक्षण घेत असून तिच्या वयात UPSC ची ओळख करून देण्याचे श्रेय तिच्या पालकांना जाते. वडील अमित साळुंखे म्हणाले,
"तिला सुरुवातीपासूनच भारताच्या प्रमुख घटकांविषयी माहिती असावी, म्हणून आम्ही तिला विविध स्थळांना घेऊन जात आहोत. UPSC मुख्यालयाचा हा दौरा तिच्या मनात देशसेवेची प्रेरणा निर्माण करेल, ही आमची भावना आहे."
लहान वयात अशा प्रकारे राष्ट्रीय संस्थांच्या भेटी आणि मार्गदर्शनामुळे आरंभीसारख्या बालवयीन विद्यार्थ्यांमध्ये पुढील काळात नेतृत्वगुण रुजण्याची आशा व्यक्त केली जात आहे. समाजमाध्यमांवर तिच्या या भेटीचा फोटो 'छोटी आयएएस' म्हणून पसंत केला जात आहे.
Ol the best aarhbhi
ReplyDeleteOl the best beta👍🌹
ReplyDeleteGood fadar good madar🙏
ReplyDelete