वक्फ दुरुस्ती कायदा २०२५ पुस्तक प्रकाशन


             वक्फ दुरुस्ती कायदा २०२५ पुस्तक प्रकाशन
मुंबई / रमेश औताडे 

द नॉलेज अँड स्किल्स फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने मुफ्ती मंजूर झियाई लिखित टाइम्स ऑफ शारिता अँड रेफॉर्म्स या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजरत अताफ, मेहबूब जिलानी,निजाम उद्दीन शाह, किशोर, मो. मुफ्ती जाहिद, हजरत मुफ्ती, निजाम उद्दीन राई, किशोर, मो.मुफ्ती गिलानी उपस्थित होते.

मुफ्ती मंजूर झिया म्हणाले, वक्फ ही एक धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक रचना आहे. वक्फची संकल्पना इस्लाममध्ये अल्लाहसाठी स्थायी पुण्यकर्म करण्यासाठी निर्माण झाली आहे. परंतु आज, सरकार वक्फ संस्थांवर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात आहे. वक्फ सुधारणा कायदा २०२५ हे त्याचे उदाहरण आहे.

अ‍ॅड. युसुफ खान म्हणाले, वक्फ बोर्ड हे स्वतंत्र संस्थान असले पाहिजे. वक्फ कायदा १९९५ मध्ये आले, पण अंमलबजावणी आजही अपुरी आहे. शाहीना सय्यद म्हणाल्या,  वक्फ संस्थांत महिला फारशा प्रतिनिधीत्वात नाहीत. ही एक शोकांतिका आहे. डॉ. फहिम अन्सारी म्हणाले, इतिहासात वक्फच्या योगदानाकडे बघितल्यास, दिल्ली, हैदराबाद, लखनौ इत्यादी ठिकाणी हजारो संस्थांचा आधार वक्फ होता. अ‍ॅड. शम्सुद्दीन रहमानी म्हणाले, वक्फ संपत्तीबाबत अनेक न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित आहेत. या कायद्यामुळे प्रकरणे अधिक गुंतागुंतीची होतील. सय्यद सलीम काझमी म्हणाले, समाजातील युवकांना वक्फ कार्यात जोडावे लागेल. त्यांना आधुनिक व्यवस्थापन आणि कायदा याचे प्रशिक्षण द्यावे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन