सामाजिक न्याय दो अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण
सामाजिक न्याय दो अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण
मुंबई / रमेश औताडे
समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न, समस्या सरकारदरबारी मांडण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करत पहिल्या टप्प्यानंतर आता मराठवाड्यातील दुसरा टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरू झालेला या राज्यव्यापी अभियानास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. रमाबाई घरकुल योजना जलदगतीने राबवा, दादासाहेब गायकवाड स्वाभिमान स्वावलंबी योजने अंतर्गत शेत जमिनी देण्यात याव्यात, बेरोजगार युवकांना थेट आर्थिक महामंडळाच्या वतीने कर्ज वाटप करावे, अनुसूचित जाती जमातीच्या अधिकाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करणारे निलंबित समाजकल्याण अधिकारी बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अटक करावी या व इतर मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी मराठवाड्यातील परभणी, अहमदनगर, नांदेड, उस्मानाबाद, नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून सामाजिक न्याय दो अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला.
या टप्प्याचे नेतृत्व शिवाजी सुंगधे, सिमा खंडागळे ( परभणी), शिवा साठे, संगिता गायकवाड, (श्रीरामपूर अहमदनगर) शर्मिला गांगुर्डे, प्रतिभा गांगुर्डे ( कळवण नाशिक) शिवाजी गच्चे, राहूल कोकरे (नांदेड) जयदेव चिंवडे, डॉ आशा पारधे, रेखा रावणगावकर (नाशिक) यांनी निवेदन सादर केली.
Comments
Post a Comment