प्राइमा आर्टच्या शुद्ध सोन्याच्या कलाकृती संग्रहाचे अनावरण

मुंबईमध्ये प्राइमा आर्टच्या 
२४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या कलाकृती संग्रहाचे अनावरण 
मुंबई / रमेश औताडे 

थायलंडमधील प्राणदा ग्रुपचा भाग असलेल्या प्राइमा आर्टने मुंबईतील विविध दागिन्यांच्या शोरूममध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या शीटमध्ये बनविलेल्या कलाकृतींच्या संग्रहाची मालिका ग्राहकांसाठी सादर केली आहे. आकर्षक डिझाईन्ससह प्राइमा आर्टने भक्ती व अध्यात्माचा सुरेख संगम साधत विविध देवतांच्या व अन्य कलाकृती २४ कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये साकारल्या आहेत.  

मुंबईमध्ये प्राइमा आर्ट संग्रह 'रिच्युअल' मालिकेत उपलब्ध आहेत, जी घरे, पूजा कक्ष आणि वैयक्तिक वेदींसाठी उपयुक्त असलेली मालिका आहे. शुद्ध सोन्याच्या शीट्सवर चितारलेली पवित्र चिन्हे, देवतांच्या मूर्ती या स्वरूपात सदर कलाकृती उपलब्ध आहेत. 'एम सिरीज' नावाचा कलाकृतींचा आणखी एक संच, उत्सव आणि औपचारिक भेटवस्तूंसाठी आदर्श असा प्रीमियम व विविध स्तरांत साकारलेला संग्रह आहे. 'गोल्डन मोमेंट्स' या मालिकेअंतर्गत कस्टमाइज्ड केलेल्या भक्तीपूर्ण व वैयक्तिक संग्रहात ठेवता येईल अशा कलाकृतींची एक खास ऑफर सादर करण्यात आली आहे. सोने खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या खरेदीदारांना वैयक्तिक संग्रहासाठी तसेच भेटवस्तू देण्यासाठी २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या शीट्समध्ये बनविलेल्या कलाकृती खरेदी करण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. हा संग्रह उत्सव, वास्तुशांती, वैयक्तिक आनंदोत्सवाच्या काळात व विविध सणांमध्ये भेट देण्यासाठी उपयोगी आहे.

मुंबईमध्ये नामांकित वामन हरि पेठे ज्वेलर्स यांच्या दादर, बोरिवली, मुलुंड, गोरेगांव, घाटकोपर शाखांमध्ये तसेच एम्. के. घारे ज्वेलर्स यांच्या कांदीवली येथील  ज्वेलरी शोरुममध्ये, अंधेरी येथील प्रदीप ज्वेलर्स व पी. के. ज्वेलर्स येथे तर गोरेगाव येथील विपुल ज्वेलर्स व बोरिवली येथील ओम दीपक ज्वेलर्स यासारख्या प्रतिष्ठित विश्वसनीय रिटेल ज्वेलर्सच्या दालनांमध्ये प्राइमा आर्टच्या कलाकृती  उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्राइमा आर्टचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विनोद तेजवानी म्हणाले, "मुंबईमध्ये आमचा विस्तार हा केवळ एक धोरणात्मक किरकोळ विक्रीचा प्रवास नाही तर तो एक सांस्कृतिक कलाकृतींचा ठेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक भारतीय ग्राहकांच्या आध्यात्मिक आणि भेटवस्तूंच्या संवेदनशीलतेशी जुळणारे कालातीत सोन्याच्या प्रतिमांचे नमुने सादर करून, परंपरेचे ललित कलेशी मिश्रण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे."

प्राइमा आर्टच्या या श्रेणीतील वाढत्या खरेदी ट्रेंडबद्दल बोलताना मैत्री तेजवानी म्हणाल्या, "भक्तीपर भेटवस्तूंचा संचय व देवाणघेवाण ही आपल्या संस्कृतीतील एक सुंदर परंपरा आहे. प्राइमा आर्टमध्ये, आम्ही आमच्या २४ कॅरेट सोन्याच्या कलाकृतींना भक्तीची कालातीत अभिव्यक्ती म्हणून पाहतो."

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन