पावसातही आंदोलनाचा पवित्र संकल्प अबाधित!



         पावसातही आंदोलनाचा पवित्र संकल्प अबाधित!
आझाद मैदान, मुंबई / रमेश औताडे 

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असतानाही, आझाद मैदानात काही सामाजिक कार्यकर्ते आपल्या आंदोलनाचा निर्धार अखंड ठेवून उभे आहेत. ओलेचिंब कपडे, चिखलाने भरलेले मैदान, हातात छत्र्या आणि तरीही चेहऱ्यावर निर्णयाचा ठामपणा!

"आमच्या मागण्या पावसामुळे थांबणार नाहीत. आम्ही या सरकारच्या कानावर आवाज पोहोचवणारच," असे एका आंदोलकांनी सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावरचा दृढ निश्चय पावसाला न जुमानणारा आहे.

पावसामुळे आंदोलनाची गती थोडी मंदावली असली, तरी भावना अधिक तीव्र झाल्या आहेत. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, "आमचं आंदोलन केवळ राजकीय नाही, ते अस्तित्वासाठी आहे!"

या परिस्थितीत सुरक्षा व्यवस्थाही कमी पडलेली दिसते. काही ठिकाणी कार्यकर्ते झाडांच्या आडोशाला उभे राहून घोषणाबाजी करत आहेत.

आंदोलन पावसातही सुरू असल्याने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या पावसात ओलेचिंब झालेले आंदोलनकर्ते शासनाच्या मनात पाझर पाडतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन