कल्याण ज्वेलर्स चे अभिनेत्री तब्बू यांच्या हस्ते उद्घाटन

         
         कल्याण ज्वेलर्स चे अभिनेत्री तब्बू यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई / रमेश औताडे 

भारतातील अग्रगण्य दागिन्यांचा ब्रँड कल्याण ज्वेलर्स यांनी आपल्या नव्या दालनाचे भव्य उद्घाटन रविवारी सिवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये केले. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तब्बू यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी तब्बू यांनी  सांगितले की, कल्याण ज्वेलर्स हा ब्रँड केवळ दागिन्यांपुरता मर्यादित नाही, तर तो भारतीय स्त्रीच्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. या दालनाचा भाग होणं माझ्यासाठी विशेष आहे.

उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी खास सवलतींची घोषणाही करण्यात आली. नवीन दालनात पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइन्समध्ये सोनं, चांदी आणि हिऱ्यांचे विविध प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत. या ठिकाणी आकर्षक अंगठ्या, हार, मंगळसूत्रे, बांगड्या व नथींची विशेष शृंखला उपलब्ध आहे.

कल्याण ज्वेलर्सचे वरिष्ठ अधिकारी श्री. टी. एस. किरण यांनी सांगितले की, नवी मुंबईमधील वाढत्या ग्राहकसंख्येला लक्षात घेऊन हे नवीन शोरूम उघडण्यात आले असून, दर्जा, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास यावर आम्ही कायम भर देत आलो आहोत.



Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन