१०२ दिवसांनी पत्रकार तुषार खरात यांची जामिनावर मुक्तता
१०२ दिवसांनी पत्रकार तुषार खरात यांची जामिनावर मुक्तता
मुंबई / रमेश औताडे
एका मागोमाग एक अशा एकूण चार केसम्ध्ये कारागृहात बंदी असलेले ‘लय भारी न्यूज'चे संपादक तुषार खरात यांची मंगळवारी कारागृहातून मुक्तता झाली आहे.
ते तब्बल १०२ दिवस कारावासात होते. न्यायालयाने त्यांचा जामिन मंजूर करताना मंत्री जयकुमार गोरे तसेच पोलिसांवर गंभीर ताशेरे ओढले आहेत.
अॅट्रॉसिटी, खंडणी, विनयभंग अशा केसेस टाकून तुषार खरात यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. पोलिसांच्या या अटक प्रक्रियेचा मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यावेळी तीव्र शब्दांत निषेध केला होता.
जामीन दिल्याबद्दल पत्रकार तुषार खरात यांनी न्यायालयाचे आभार मानले. न्यायालय सत्याचीच बाजू उचलून धरते, हे माझ्या प्रकरणातून स्पष्ट झाल्याची भावना तुषार खरात यांनी व्यक्त केली.
माझ्या या संघर्षात एका रुपयाच्या मानधनाची अपेक्षा न ठेवता तब्बल ३६ वकिलांनी माझ्या वकीलपत्रावर सह्या केल्या.
तसेच राज्यभरातील विविध पत्रकार संघटना आणि सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी यांनी या संघर्षात मला व माझ्या कुटुंबाला भक्कम आधार दिला, त्याबददल मी या सगळ्यांचा आभारी आहे, असे खरात यांनी सांगितले.
Comments
Post a Comment