गुडघ्याचे ऑपरेशन आता डॉक्टर ऐवजी रोबोट करणार


मुंबई / रमेश औताडे 

म्हातारपणात गुडघ्याची दुखणी वाढतात. त्यासाठी अनेक जण डॉक्टरची खात्री व न परवडणारा खर्च पाहता ऑपरेशन करायला घाबरतात. मात्र आता गुडघ्याचे ऑपरेशन डॉक्टर ऐवजी रोबोट करणार आहे.

बैठी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, लठ्ठपणा, वाढते वय, गुडघ्याचा संधिवात आणि दुखापत यामुळे देशभरातील कित्येक लोकांना सांध्यांच्या समस्या सतावत आहेत. या पार्श्वभूमीवर अपोलो स्पेक्ट्रा या नामांकित हॉस्पिटल ने मंगळवारी मुंबईत " गुडघा ऑपरेशन रोबोट " चे अनावरण प्रसिद्ध अभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते केले. यावेळी डॉ अलोक पांडे उपस्थित होते.

तंत्रज्ञानाने आपली जगण्याची पद्धत बदलली आहे आणि आरोग्य सेवेने खूप मोठा पल्ला गाठला आहे. अपोलो स्पेक्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण आरोग्य क्षेत्रासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे ठरले आहे. असे अरबाज खान म्हणाले.

देशातील दुसरी सर्वात मोठी समस्या संधिवाताची आहे. भारतातील सुमारे २३.४६ दशलक्ष लोकांना ही समस्या असून दैनंदिन हालचाली सहजतेने करता येत नसल्याने ऑपरेशन करावे लागते. असे डॉ सफिउद्दिन नदवी व रुपिंदर कौर यांनी सांगितले. यावेळी हॉस्पिटलचे श्रीराम अय्यर व इतर डॉक्टर उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"