Posts

Showing posts from February, 2026

जेफ्री एपस्टीन अहवालाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या जेफ्री एपस्टीन प्रकरणासंदर्भात अलीकडे समोर आलेल्या अहवालांमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, पारदर्शकता राखली जावी आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे, या मागणीसाठी मुंबई प्रदेश युवक काँग्रेस युवक अध्यक्ष झीनत शब्रीन यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान जवळ मुंबई प्रेस क्लब समोर निषेध आंदोलन करण्यात आले. जेफ्री एपस्टीन प्रकरणात मानवी हक्क, सत्तेचा गैरवापर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये सत्य दडपले जाऊ नये, जनतेसमोर सर्व बाबी स्पष्ट व्हाव्यात, यासाठी युवक काँग्रेसने आपली भूमिका मांडली. यावेळी पंकज चौधरी,हुसेन शेख, अमनदीप सैनी, आणि तेजस चांदुरकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन पूर्णतः अहिंसक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. आंदोलनासाठी मुंबई पोलिसांची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती. सार्वजनिक सुव्यवस्था, वाहतूक किंवा कायदा-सुव्यवस्थेला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता आयोजकां...

बारामतीतील खाजगी विमान धावपट्टीवर प्रश्नचिन्ह

Image
मुंबई / रमेश औताडे  बारामती (पुणे) येथे उभारण्यात आलेल्या विमान धावपट्टीबाबत सुरक्षितता आणि नियमपालनाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी या धावपट्टीच्या कार्यपद्धतीवर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे. सेंगर यांच्या म्हणण्यानुसार, बारामती परिसरात सुरू असलेली ही विमान धावपट्टी आवश्यक मूलभूत सुविधा आणि सुरक्षा यंत्रणांशिवाय कार्यरत असल्याचा दावा करण्यात येत आहे. विमान वाहतुकीसाठी आवश्यक असलेली सिग्नल व्यवस्था, नियंत्रण प्रणाली आणि आपत्कालीन सुविधा या ठिकाणी अपुऱ्या असल्याचे ते सांगतात. या पार्श्वभूमीवर, संबंधित यंत्रणांनी या धावपट्टीची सखोल तपासणी करावी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. बारामती परिसरात यापूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी विमान दुर्घटनेचा संदर्भ देत, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्...