तर छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवणार -आय ए सी अध्यक्ष हेमंत पाटील
मुंबई / रमेश औताडे राज्यात बहुसंख्येने असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या समस्या आहे तिथेच आहेत. तथाकथित ओबीसी नेत्यांनी समाजाच्या मतांचा वापर केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी करून घेतला, असा थेट आरोप करत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आय ए सी ) राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यानी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पुर्ण समर्थन असल्याचे यावेळी पाटील यांनी जाहिर केले. जरांगे पाटील यांनी संधी दिली तर ओबीसी आणि मराठा बांधवांच्या वतीने नाशिक मधून छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे पाटील म्हणाले. भूजबळ आणि काही तथाकथित नेत्यांना धडा शिकवण्यासाठी राज्यभरात त्याच्याविरोधात समक्ष उमेदवार देण्याचा संघटनेचा प्रयत्न असणार आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी रास्तच आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने मोठे मन दाखवून जरांगे यांना समर्थन दिले तर, आगामी का...