Posts

मानवी हक्क दिनानिमित्त शांतता व ऐक्याचा संदेश

Image
मानवी हक्क दिनानिमित्त शांतता व ऐक्याचा संदेश मुंबई / रमेश औताडे  मानवी हक्क दिनानिमित्त स्पीड ऑफ पिस इंडिया आणि मुंबई बहाई समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष समुदाय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात स्पीड ऑफ पिस चे माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच बहाई समाजातील सदस्य असे जवळपास १०० जण सहभागी झाले होते. शांतता, न्याय आणि मानवतेच्या ऐक्याबद्दलची समान बांधिलकी व्यक्त करत उपस्थितांनी एकात्मतेच्या भावनेत सहभाग घेतला. दोन्ही समुदायांच्या समान मूल्यांवर आधारित या संमेलनात शांतता, समता, बंधुता आणि न्याय या मानवी हक्कांच्या जिवंत अभिव्यक्तींवर चिंतन करण्यात आले. सागर गांगुर्डे, प्रोग्राम्स मॅनेजर उर्मी चंदा आणि मुंबई बहाई समाजाच्या नर्गिस गौर यांच्या संयुक्त आयोजनातून हा कार्यक्रम साकारला गेला. मानवी हक्क कार्यकर्ते ॲड. विनोद शेट्टी यांनी सत्तेचा गैरवापर आणि मानवी हक्कांचे होत असलेले उल्लंघन यावर प्रकाश टाकला.  बहाई दृष्टिकोन मांडताना ॲड. जेना़ सुनावाला यांनी शांतता ही केवळ स्वप्न नसून अटळ आहे, असा विश्वास व्यक्त केला. समाजपरिवर्तनात युवक आणि कनिष...

Free distribution food seva

Image
     P R News / Ramesh Autade  Adnyan.Org Free distribution food seva for various part of India silent devotees came there to visit tribute to Bharat Ratna Shri Babasaheb Ambedkar ji @Chaitanya Bhoomi, Shivaji park, Dadar West, Mumbai Maharashtra, India by 🌴Shetty Vijay S, Mr.Sanjay Dhaware, Prashant Shirgoankar, Sanjay kudalkar & Adnyan .Org Team on 06/12/2025.

सफाई कामगारांच्या घराचे आंदोलन निवडणुकीच्या तोंडावर तीव्र होणार - अशोक जाधव यांचा सरकारला इशारा

Image
नागपूर / रमेश औताडे  शहराची स्वच्छता करत असताना आपल्या मालकी हक्काचे घर कधी होणार. अशी स्वप्न अनेक वर्ष पाहत असणारा सफाई कामगार आता नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करून हक्काचे घर मागत आहे. सरकारने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही तर आंदोलन निवडणुकीच्या तोंडावर तीव्र होईल असा इशारा म्युनिसिपल मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे. मुंबईतील २१ हजार ८६८ सफाई कामगारांपैकी केवळ पाच हजार ८०० कामगारांना सरकारने मालकी हक्काची घरे दिली असून उर्वरित हजारो कामगारांचे प्रश्न प्रलंबितच आहेत. या अन्यायाविरोधात म्युनिसिपल मजूर युनियनने नागपूर विधानसभेसमोर लक्षवेधी उपोषण सुरू केले. अनेक वर्षांपासून शासन व महापालिकेकडे मालकी हक्काच्या घराची मागणी केली. मात्र अद्यापही १६ हजार  हून अधिक कामगारांना घर मिळालेले नाही. विधानसभेच्या समित्यांमध्येही कामगारांच्या घरकुल निर्णयाला संमती देण्याची चर्चा झाली होती. परंतु अंतिम निर्णय लांबत चालल्याने कामगारांच्या सहनशक्तीचा अंत होत असल्याचे युनियनचे सरचिटणीस वामन झरेकर, कार्याध्यक्ष रामचंद्र बिराजदार यांनी सांगितल...

देशात आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का

Image
मुंबई / रमेश औताडे  हलकीचे जीवन जगत असताना आमच्या झोपड्या तोडल्या जातात. आमची मुले संसार रस्त्यावर येत आहे. या देशात आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का ? असा सवाल मानवाधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर या जनतेच्या वतीने मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे यांनी केला आहे.  बोरिवली पश्चिम येथील पैनगर झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी सहाय्यक आयुक्त प्रफुल तांबे यांची भेट घेण्यात आली. पै नगर परिसरातील नागरिकांना वारंवार बेघर केले जात असल्याने सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही झोपडीवर कारवाई करू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गरिबाना त्यांच्या हक्काचे घर मिळालेच पाहिजे. पुनर्वसनाशिवाय कारवाई करणे म्हणजे दुर्बल घटकांवर अन्याय करणे होय असे सचिन लोंढे यांनी सांगितले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील राखीव वनात आर्थिक गैरव्यवहार?

Image
निसर्गप्रेमींचा गंभीर आरोप;  मुंबई / प्रतिनिधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तथा आरे वनपरिमंडळातील राखीव वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता व पॅराग्रास गवताच्या अनधिकृत कापणी-विक्रीचे व्यवहार सुरू असल्याचा आरोप निसर्गप्रेमी व विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे. हे आरोप प्रशासनाच्या लक्षात जावेत आणि वस्तुस्थितीची तपासणी व्हावी, इतक्याच उद्देशाने त्यांनी ही माहिती सार्वजनिक केल्याचे सांगितले. महसूल व वनविभागाच्या संयुक्त अधिसूचनेनुसार दि. १२ ऑक्टोबर २०२० रोजी आरे दुग्धवसाहत परिसरातील २८६.१३२ हेक्टर क्षेत्र राखीव वन घोषित करण्यात आले. दि. ०७ जून २०२१ रोजी हे क्षेत्र अधिकृतपणे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर वनहद्दी स्पष्ट करण्यासाठी सिमेंट खांब व सूचना फलक बसवले गेले. डॉ. माकणीकर यांच्या मते, युनिट क्र. २, ३, ४ व १३ या विभागांमध्ये अंदाजे ५० ते ८० एकर राखीव वनक्षेत्रात रात्रीच्या सुमारास पॅराग्रास गवत कापणी होऊन मुंबईतील तबेल्यांमध्ये पुरवठा केल्याचे निदर्शनास आले. या प्रक्रियेत काही पातळ्यांवर आर्थिक अनियमितता होत असल...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत अनुयायांना पाणी वाटप

Image
मुंबई / रमेश औताडे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया एम्पॉवरमेंट परिषद आणि सिद्धिविनायक सेवा संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व संस्थेच्या अध्यक्ष सुनिता तूपसौंदर्य यांनी केले. वाढती गर्दी आणि सततची वाहतूक यामुळे भाविकांना पिण्याच्या पाण्याची विशेष गरज भासते. हे लक्षात घेऊन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर चैत्यभूमी परिसरात फिरून भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. पाणी वाटपाच्या या सेवेत महिलांसह युवकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन दरवर्षी विविध सेवाकार्ये राबवण्याचा संस्थेचा संकल्प असून, यंदाही त्यांनी शिस्तबद्धपणे सेवा दिली. ‘‘बाबासाहेबांच्या तत्त्वांना मानणाऱ्यांची सेवा करण्याचा आम्हाला अभिमान आहे,’’ असे अध्यक्ष सुनिता तूपसौंदर्य यांनी यावेळी सांगितले. भाविकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, गर्दीच्या वातावरणात थंड पिण...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सेवाकुंडतर्फे अल्पोपहार वाटप

Image
मुंबई / रमेश औताडे  डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चहा बिस्कीट असा अल्पोपहार वाटप करण्यात आला. ट्रस्ट चे अध्यक्ष अश्वजीत भैया गायकवाड, सल्लागार जयश्रीताई गायकवाड, सरचिटणीस अभिजीत गायकवाड, विश्वस्त चित्राताई गायकवाड, ट्रस्टी संजय कर्णिक, नंदकुमार शहाडे आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सेवा दिली. यावेळी  बुद्धगया येथील भंतेजींनी बुद्ध वंदना सादर करून गायकवाड परिवाराला शुभाशीर्वाद दिले.